Breaking News | Sangamner: पोलिसांकडून १७ गाय-वासरांची कत्तलीतून मुक्तता, संगमनेर पोलिसांची कोल्हेवाडी रोडवर कारवाई, सुमारे ५ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल केला जप्त, कत्तलखान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा आला ऐरणीवर.
संगमनेर: कत्तल करण्यासाठी गोवंश जातीचे जनावरे पिक अप जीपमधून कोल्हेवाडी रोड येथे घेऊन जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळताच पोलिसांनी सोमवारी दुपारी केलेल्या कारवाईत १७ जिवंत वासरे, चार चाकी वाहन, एक गाय असा ५ लाख ४९ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.
पिकअप गाडीमध्ये कत्तली करीता गोवंश जनावरे आणली जाणार आहेत, अशी माहिती मिळाल्याने तेथे जाऊन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले. सोमवारी दुपारी २ वाजता कोल्हेवाडी रोड येथे छापा टाकला असता या ठिकाणी संशयित वाहन पिकअप नं. एम एच-१२-एफ डी २४५६ अडविले असता वाहनाचे चालकास थांबवुन त्याचे नाव विचारले असता त्याने परवेज आरिफ सयय्द (वय २५ वर्ष रा. मदिनानगर) असे सांगितले. गाडीत काय भरले आहे, याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्या पिकअपमध्ये १७ गोवंश जातीचे जीवंत वासरे व एक जर्शी गाय आढळून आली. या गोवंश जातीचे जनावराबाबत त्याचेकडे पावतीची मागणी केली असता त्याच्याकडे जनावरांबाबत कोणतीही पावती नव्हती. ही गोवंश जनावरांची आरोपीने पिकअपमध्ये दाटीवाटीने निर्दयतेने गाडीत भरून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, या कारवाईत ५ लाख रुपयांची पिक अप, ३४ हजार रुपयाची गोन्हा जातीची १७ गोवंश काळ्या व पांढऱ्या रंगाची वासरे, १५ हजार रुपये किंमतीची गोवंश जातीची जर्सी गाय असा एकूण ५ लाख ४९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरिफ सयय्द याचे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Web Title: Cattle smuggling again from Sangamner
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study