Home अकोले बारावीच्या निकालात राजूर येथील सर्वोदयचे उत्तुंग यश

बारावीच्या निकालात राजूर येथील सर्वोदयचे उत्तुंग यश

Breaking News | Rajur: बारावीच्या निकालात राजूर येथील सर्वोदयचे उत्तुंग यश

Sarvodaya from Rajur has achieved great success in the 12th results

अकोले: तालुक्यातील राजूर येथील गुरुवर्य रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर विद्यालयाचा बारावीचा निकाल ९२.१४% लागला असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर आणि उप प्राचार्य अण्णासाहेब धतुरे यांनी दिली. कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीसाठी ४२० विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी ३८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

यामध्ये सविस्तर माहिती अशी की, विज्ञान शाखेचा ९६.७१%, वाणिज्य शाखेचा ९३.७१, कला शाखेत ८८.०२ असा एकूण ९२.१४ टक्के निकाल लागला असल्याची माहिती देण्यात आली.  वाणिज्य शाखेची कु.  देशमुख मयुरी बाळू हिने ८६.८३ टक्के मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.  तर कु. सावंत विजया नारायण हिने ८६ टक्के मिळवत दुसरा क्रमांक मिळविला आहे. साबळे सुयोग यशवंत याने ८४.५० टक्के मिळवत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. 

या सर्व उत्तुंग भरारी मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष  मनोहर देशमुख, सचिव टी. एन. कानवडे, कोषाध्यक्ष विवेक मदन, व सर्व संचालक मंडळ, माजी प्राचार्य तसेच प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उप प्राचार्य आण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक एस.आर.गिरी यांनी अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

यंदा बारावीचा निकाल राज्यात 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.

Web Title: Sarvodaya from Rajur has achieved great success in the 12th results

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here