Home अहमदनगर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, गुन्हा दाखल

Nevasa woman by showing the lure of marriage

नेवासा | Nevasa : नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे रहिवासी असणाऱ्या तीस वर्षीय तरुणीवर घरात घुसून लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने वडाळा बहिरोबा परिसरात तसेच नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या पिडीत तरुणीवर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आरोपी गोरख काळे याने लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. तर गोरख काळे याचे साथीदार नामदेव काळे व कैलास सुकळकर यांनी तिच्या घरी जाऊन परिवाराला मारहाण व धमकी दिली आहे. मोबाईलवर मेसेजेस करत धमक्या देण्यात आल्या.

याप्रकरणी या पिडीत तरुणीने   शनीशिंगणापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून गोरख काळे, नामदेव काळे व कैलास सुकळकर रा. वाटापूर ता. नेवासा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक भोये यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Nevasa woman by showing the lure of marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here