Home राहुरी Rahuri: राहुरी तालुक्यात आज २० करोना पॉझिटिव्ह

Rahuri: राहुरी तालुक्यात आज २० करोना पॉझिटिव्ह

Rahuri Taluka Corona infected 20 today

राहुरी | Rahuri : राहुरी तालुक्यात आज दुपारपर्यंत प्राप्त अहवालात २० जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८६९ इतकी झाली आहे. राहुरी शहरात सर्वाधिक करोना बाधित तब्बल १५ रुग्ण आढळून आले आहेत. राहुरी शहरात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढलेला आहे. शहरात प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

राहुरी शहरात १५ रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये ४८,३९,४०,१३,३५.६०,१५,६०,३५ वर्षीय पुरुष तर ५०,२५,३४,१९,१३,२८ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत.

तसेच तालुक्यातील वांबोरी येथील ६ वर्षीय मुलगा, ६ वर्षीय मुलगा, माहेगाव येथे २२ वर्षीय महिला, कुकडवेडे येथे ४५ वर्षीय पुरुष, देवळाली प्रवरा येथे ४७ वर्षीय महिला करोनाबाधित करोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे तालुक्याची बाधितांची संख्या ८६९ वर पोहोचली आहे.

Web Title: Rahuri Taluka Corona infected 20 today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here