Home अकोले अकोले: निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सुटले

अकोले: निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सुटले

Breaking News | Akole: धरणातून सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन, आवर्तन २५ दिवस सुरु राहणार.

Summer circulation is released from Nilwande Dam

अकोले: भंडारदरा लाभक्षेत्रासाठी कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार निळवंडे धरणातून सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन शनिवार दि. २७ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता १३५० क्युसेकने सोडण्यात आले.

सदर आवर्तन २५ दिवस सुरु राहणार असून खालील भागाला पाणी पोहचेपर्यंत सुरुवातीला ८ दिवस दररोज दोन तास वीज पुरवठा करणार असल्याचे समजते. सद्यस्थितीत भंडारदरा धरणात ३३४३ दलघफू पाणी शिल्लक असून निळवंडे धरणात २५४८ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे.

दोन्ही धरणांत जवळपास ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्यात सिंचन व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे प्रवरा नदीकाठच्या गावांना दिलासा मिळणार आहे. यामुळे ऐन उन्हाच्या तडाख्यात शेतकऱ्यांना उभी पिके जगवण्यास मदत होणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पाण्याचा विसर्ग कमी-अधिक होणार असल्याचे नदीकाठच्या गावांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

Web Title: Summer circulation is released from Nilwande Dam

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here