इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत वाढ, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अपील थेट यांसकडून
अहमदनगर | Ahmednagar News: वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी अपील थेट राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात आपील केले आहे. पुत्रप्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संगमनेर जिल्हा न्यायालयाने खटला रद्द केला होता. त्यानंतरही कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अंधश्रद्धा निमूर्लन समितीने यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. आता राज्य सरकारनेही उच्च न्यायालयात आपील दाखल केले आहे. त्यामुळे महाराजांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य सरकारतर्फे २२ जुलैला आपील दाखल करण्यात आले आहे. त्यावर पुढील प्रक्रिया सुरू आहे. परंतु अजून सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही. या प्रकरणातील सरकारतर्फे फिर्याद दिलेले संगमनेरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर भवर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आपील दाखल करण्यासंबंधीचा निर्णय होण्यास वेळ लागला. अखेर नवीन अधिकाऱ्यांमार्फत हे आपील दाखल झाले आहे.
यामधील तक्रारदार अंधश्रद्धा निमूर्लन समितीच्या अॅड. रंजना गवांदे यांनी यापूर्वीच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर २ ऑगस्टला सुनावणी होणार आहे. सरकारतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिका सुनावणीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
Web Title: Ahmednagar News Indorikar Maharaj’s difficulty increased