अहमदनगर ब्रेकिंग: शेतात आढळला मृतदेह
Breaking News | Ahmednagar: शेतात कुजलेल्या अवस्थेत आचारी काम करणाऱ्या इसमाचा मृतदेह (Dead body) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
श्रीरामपूर: बेलापूर गावातील अयोध्या कॉलनीच्या बाजूला असलेल्या ज्ञानेश्वर ओहोळ यांच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत आचारी काम करणाऱ्या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदू वायदंडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
गट नं.४६ मधील ओहोळ यांच्या शेतातून उग्र वास येत असल्याने शेतमालक सेवानिवृत्त मंडलाधिकारी ओहोळ हे उसात पाहण्यासाठी गेले असता त्यांना तिथे एक पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांना कळविले. सहाय्यक फौजदार अक्षय हापसे, पोलीस कॉस्टेबल भारत तमनर, पोलीस पाटील अशोक प्रधान हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घटनेचा पुढील तपास पोलीस अधिकारी हापसे हे करत आहेत. चंदू वायदंडे यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याबाबत नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
Web Title: dead body was found in the field
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study