Home Ahmednagar Live News Suicide | राहत्या घरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide | राहत्या घरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Young man commits suicide by hanging himself at his residence

Ahmednagar | पारनेर  | Parner:  पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील राळेगण फाटा येथील एका तरुणाने  राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या ( Suicide)  केल्याची घटना घडली आहे. नवनाथ भानुदास शेळके (वय 35) असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत ज्ञानदेव यशवंत शेळके रा. वाडेगव्हाण (राळेगण सिद्धी फाटा) यांनी सुपा पोलिसांना माहिती कळविली. यामध्ये नवनाथ भानुदास शेळके हा वाडेगव्हाण फाटा येथे कुंटुंबासह राहात होता. मंगळवार दि.10 मे 2022 रोजी पहाटे नवनाथ शेळके यांनी त्याच्या राहात्या घरी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास घराच्या छताच्या अँगलला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली.

सुपा पोलीसांना घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक डॉ. नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला. सदर मृतदेह उत्तराय तपासणीसाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. आत्महत्या मागील कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास साहाय्यक फौजदार पठाण करत आहेत.

Web Title: Young man commits suicide by hanging himself at his residence

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here