Home नाशिक सुनेची आत्महत्या; माजी नगरसेविका सासूसह पतीवर गुन्हा दाखल

सुनेची आत्महत्या; माजी नगरसेविका सासूसह पतीवर गुन्हा दाखल

Breaking News | Nashik Crime: ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

daughter-in-law's suicide A case has been filed against the former corporator's mother-in-law

नाशिक : मखमलाबाद परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत विवाहिता या माजी नगरसेविका सिंधू खोडे यांच्या स्नुषा असून, पती व सासूच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप करत विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीनुसार माजी नगरसेविका व मृत विवाहितेच्या पतीविरोधात म्हसरुळ पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

कावेरी आशिष खोडे (३५, रा. धनंजय बंगला, मखमलाबाद) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. कावेरी यांनी शनिवारी (ता.३०) सकाळी साडेदहाच्या सुमारास राहत्या घराच्या हॉलमध्ये साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास लावून घेतला. उपचारासाठी दीर धनंजय खोडे यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.

दरम्यान, याप्रकरणी मृत कावेरी यांचे वडील मधुकर भीमराव वायकंडे (६२, रा. लोखंडे मळा, दसक, जेलरोड) यांच्या फिर्यादीनुसार, मृत कावेरी यांची सासू सिंधू भीमराव खोडे, पती आशिष भीमराव खोडे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीनुसार, संशयितांनी कावेरीचा विवाह झाल्यावर २०१३ ते ३० मार्च २०२४ या कालावधीत मुंबईत फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून दहा लाख रुपये आणावेत, यासाठी कावेरीकडे पैशांची मागणी केली. पैसे न आणल्याने संशयितांनी तिचा छळ सुरू केला. या जाचास कंटाळून कावेरीने आत्महत्या केली. कावेरीच्या पश्चात दोन अपत्ये आहेत. दरम्यान, कावेरीचा पती आशिष हा बृहन्मुंबई महापालिकेत अभियंता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: daughter-in-law’s suicide A case has been filed against the former corporator’s mother-in-law

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here