Home Ahmednagar Live News अहमदनगर ब्रेकिंग:  पुरात एक जण गेला वाहून, मुसळधार पाऊस अन…

अहमदनगर ब्रेकिंग:  पुरात एक जण गेला वाहून, मुसळधार पाऊस अन…

Ahmednagar News: मुसळधार पावसाने (Rain) ओढ्याला आलेल्या पुरामध्ये एक जण वाहून गेल्याची घटना घडली.  प्रशासन, गावकऱ्यांची शोधाशोध.

One person was swept away in the flood, heavy rain 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथील कन्हेर ओढ्याला आलेल्या पुरामध्ये एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे.  . ही घटना मंगळवारी (दि.२६) घडली. शोभाचंद गणपत घोडके (वय ५२) हे ओढा ओलांडताना पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या वेगात घोडके पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात पडले. सहा तासांच्या शोध मोहिमेनंतरही त्यांना शोधण्यात अपयश आले.

सोमवारी मध्यरात्री आढळगाव कोकणगाव, भावडी परिसरात जोरदार पाऊस झाला. भावडी, कोकणगाव गावातील तलाव भरल्यामुळे पाणी खाली झेपावले. चांडगाव गावालगत असलेल्या कन्हेर ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले. प्रवाहाचा वेग जास्त होता. मंगळवारी १०.३० वाजेच्या सुमारास पुलावरून ओढा ओलांडत असताना शोभाचंद घोडके पाण्याच्या वेगामुळे प्रवाहात खेचले गेले.

याबाबत माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही  तरुणांनी शोधण्याचा प्रयत्न केला. अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले महसूल विभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पेडगाव येथील तरुणांसह श्रीगोंदा येथील आपदा मित्रांनी घोडके यांचा शोध घेतला. परंतु, गढूळ पाण्यामुळे शोधमोहीम अपयशी ठरली.

Web Title: One person was swept away in the flood, heavy rain 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here