Home Accident News संगमनेर:  ग्रामपंचायत सदस्य तरुणाचे अपघाती निधन

संगमनेर:  ग्रामपंचायत सदस्य तरुणाचे अपघाती निधन

Accident News: जोरदार पाऊस असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाने निर्मळ पिप्री-लोणी रस्त्यावर तरुणाच्या दुचाकीला हुलकावणी दिल्याने अपघात.

Gram Panchayat member youth died in an accident

संगमनेर: आश्वी खुर्द येथील निशिकांत सोन्याबापू बर्डे (वय २७) या तरुणाचे सोमवारी रात्री अपघातात दुर्दैवी निधन झाले. मंगळवारी (दि. २६) या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निशिकांत बर्डे हा तरुण राहाता येथील बंधन बँकेत नोकरी करत होता. सोमवारी सायंकाळी ८ ते ९ च्या दरम्यान राहत्याहून दुचाकीवरून घराच्या दिशेने येत होता. जोरदार पाऊस असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाने निर्मळ पिप्री-लोणी रस्त्यावर निशिकांतच्या दुचाकीला हुलकावणी दिली. झालेल्या अपघातात बर्डे याच्या डोक्याला दुखापत झाली होती.

 परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानंतर आश्वी खुर्द येथे शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, एक भाऊ, भावजय, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. निशिकांत बर्डे आश्वी खुर्द ग्रामपंचायतीचा विद्यमान सदस्य होता.

Web Title: Gram Panchayat member youth died in an accident

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here