Home अकोले अकोले शहर परिसर, संगमनेरासह जिल्ह्यात मुसळधार  पाउस;  ओढे-नाले वाहू लागले

अकोले शहर परिसर, संगमनेरासह जिल्ह्यात मुसळधार  पाउस;  ओढे-नाले वाहू लागले

Ahmednagar News: नगर, पाथर्डी, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, संगमनेर  या तालुक्यात मुसळधार पाऊस (Rain).

Akole city area, heavy rain in the district including Sangamner

अहमदनगर : अहमदनगर दीड महिन्यानंतर जिल्ह्यात प्रथमच सलग पाऊस पडत आहे. उत्तरा नक्षाच्या अखेरीस जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने रब्बी हंगाम तरी चांगला घेता येईल, अशा आशा निर्माण झाल्या आहेत. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात रोज पाऊस पडत आहे. मंगळवारी दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली.

उत्तरा फाल्गुनीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी सायंकाळी सव्वापाच वाजता अकोले शहर परिसरासह तालुक्याच्या पूर्व भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळला. बुधवारी हस्त नक्षत्र सुरू होत असून, वाहन बेडूक आहे. बेडकाची डराव डराव वाढण्यासाठी हस्त बरसेल, अशी आशा आहे. कळस, सुगाव, अकोले, वाशेरे, धामणगाव आवारी, आंबड, इंदोरी, मेहेंदुरी, भोडी, बहिरवाडी अगदी विठे घाटापर्यंत दमदार पाऊस पडला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. देवठाण, गणोरे भागात धुवाधार पाऊस झाला. सखल भागात पाणी साठले होते. ओढे-नाले खळखळा वाहत होते. संगमनेर तालुक्यात विविध भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. 

अकोले तालुक्यातील गणोरे परिसरात मंगळवार (दि. २६) सायंकाळी जोरदार पाऊस झाला. गणोरे पाणंदीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने मोटारसायकल चालवणेही अवघड झाले होते. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर शुक्रवारी, शनिवारी व रविवारी अनेक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. ओढे, नाले वाहू लागले. तलाव, बंधाऱ्यांमध्ये पाणी साठले.

कोपरगाव तालुक्यातील वाजेनंतर जोरदार पावसाला सुरुवात दहिगाव बोलका, श्रीरामपूर सुरुवातील रिमझिम पाऊस होता. मात्र, झाली. अकोले तालुक्यातील पूर्व तालुक्यातील बेलापूर, उक्कलगाव, पाच वाजेदरम्यान जोरदार पाऊस सुरू भागात दुपारी जोरदार पाऊस झाला. राहाता तालुक्यातील पुणतांबा, दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी झाला. सुमारे अर्धा तास हा पाऊस सुरू पाथर्डी तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू म्हैसगाव येथे चांगला पाऊस झाला.

दहिगाव: मोटारसायकलवरुन मुलीला शाळेतून घेऊन येत असताना अंगावर वीज पडून वडील व मुलगी जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शेवगाव तालुक्यात घडली. मठाचीवाडी रांजण रस्त्यावर आमले वस्तीजवळ वीज कोसळली. त्यात वडील रवींद्र साहेबराव तांगडे (३६) व मुलगी मनस्वी रवींद्र तांगडे (६ वर्ष) असे दोघे जखमी झाले. जवळ राहणाऱ्या ग्रामस्थांनी मदत करत त्यांना उपचारांसाठी अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.  नेवासा तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील पाचेगाव, बेलपिंपळगाव परिसरात सलग पाचव्या दिवशी पावसाने हजेरी लावली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता आलेल्या पावसाने सुमारे तासभर हजेरी लावली. सोमवारीदेखील रात्रीही आठ वाजता पाऊणतास जोरदार पाऊस पडला. पर्जन्यमापकावर या पावसाची २३ मिलिमीटर इतकी नोंद झाली होती.

Web Title: Akole city area, heavy rain in the district including Sangamner

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here