Home अकोले अकोलेतील घटना: बिबट्याची बालिकेवर झडप, गंभीर जखमी

अकोलेतील घटना: बिबट्याची बालिकेवर झडप, गंभीर जखमी

Akole Bibatya grabs girl, seriously injured 

अकोले| Akole: अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द गावापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर रस्त्यालगत घरासमोर खेळत असताना बिबट्याने झडप मारत तिला घेऊन जात असताना दैवबलत्तर म्हणून ती वाचल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली आहे. या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली असून अकोले ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून नंतर लोणी येथे नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.   

माई जनक वैद्य (वय दीड वर्ष) असे या बालिकेचे नाव आहे.

सुगाव खुर्द गावापासून सुमारे अर्धा किलो मीटर अंतरावर सुखदेव भिकाजी वैद्य यांचे रस्त्यालगत घर आहे. त्यांची नात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घराच्या ओट्यावर खेळत होती. बाजूच्या डाळिंबाच्या बागेतून अचानक आलेल्या एका बिबट्याने या बालिकेवर झडप घालून तिला जबड्यात पकडले व तिला घेऊन चालला होता. हे दृश्य पाहून तेथे असलेल्या तिच्या बहिणींनी आरडा ओरडा सुरू केला, त्याच वेळेला समोरून एक दूधवाला येत होता. मोटारसायकल च्या प्रकाशाने तसेच अचानक मोटरसायकल समोर आल्यामुळे बिबट्या डचकला व त्याने मुलीला तेथेच टाकून बाजूच्या उसात पळ काढला.

घरापासून सुमारे 100 फूट बिबट्या या मुलीला घेऊन गेला होता.सुदैवाने बाजूच्या उसात तो घुसण्या पूर्वीच समोरून मोटारसायकल वाला आल्याने ही बालिका बचावली. या घटनेने प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या व जखमी झालेल्या या बलिकेच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता.तिला तातडीने अकोले येथील डॉ. भांडकोळी यांचे रुग्णालयात आणण्यात आले,तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला येथील डॉ बुळे यांच्या रुग्णालयात दाखल करणयात आले. तिच्या गळ्या भोवती बिबट्याच्या दातामुळे गंभीर जखमा झालेल्या आहेत.एकूण 25 टाके पडले आहेत.

घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम व त्यांचे सहकारी तातडीने रुग्णालयात आले. घटनेची माहिती मिळताच आ. डॉ. किरण लहामटे यांनीही रुग्णालयात येऊन जखमी बालिकेची पाहणी केली.

Web Title: Akole Bibatya grabs girl, seriously injured 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here