Home राहुरी डंपरची दुचाकीला जोरदार धडक, दोघे जागीच ठार

डंपरची दुचाकीला जोरदार धडक, दोघे जागीच ठार

Rahuri Shani Shinganapur road Accident 

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथे शनी शिंगणापूर रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे जण जागीच ठार झाले आहेत. आज रविवारी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

या अपघातात शरद रावसाहेब कणगरे वय ३६, अनिल मधुकर पंडित वय ४५ दोघेही रा. उंबरे माळेवाडी मृत्यू झाले आहेत.

राहुरी शनी-शिंगणापूर रस्त्याचे काम चालू आहे. या कामासाठी खडी वाहतुकीच्या डंपरने भरधाव वेगाने समोर चाललेल्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. या धडकेत दोघांचा नाहक बळी गेला.

डंपर चालकमद्य धुंद अवस्थेत होता. त्याची अवस्था पाहून नागरिकांचा संताप वाढला. त्यांनी डंपर चालकाला बेदम चोप दिला. राहुरी पोलीस ठाण्यात डंपर नेण्यात आला. राहुरी ग्रामीण रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.  अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

See: Latest Entertainment News and Latest Marathi News

Web Title: Rahuri Shani Shinganapur road Accident 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here