अहमदनगर: दोन लॉजवर छापा; वेश्याव्यवसाय, ६ महिलांची सुटका
Ahmednagar News:दोन लॉजवर पोलिसांनी छापा, प्रत्येकी तीन महिलांच्या सहाय्याने वेश्या व्यवसाय करताना पोलिसांना आढळून आला.
श्रीगोंदा: तालुक्यातील गव्हाणवाडी येथील दोन लॉजवर पोलिसांनी छापा टाकला आहे. सोनल गार्डन व अमृत लॉज असे छापा टाकलेल्या दोन लॉजचे नावे असून बालाजी चंदन नरहरी व रामलखण भैय्यालाल वर्मा (दोघे रा. गव्हाणवाडी, ता. श्रीगोंदा) असे कारवाई करण्यात आलेल्या दोघांच नावे आहेत.
या प्रकरणात ६ महिलांची सुटका करण्यात आली आहे. बेलवंडी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. बालाजी नरहरी हा सोनल गार्डन तर रामलखन वर्मा हा अमृत लॉजवर प्रत्येकी तीन महिलांच्या सहाय्याने वेश्या व्यवसाय करताना पोलिसांना आढळून आला. एकूण ६ महिलांची सुटका करण्यात आली. तसेच दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोनि. संजय ठेंगे यांच्या दोन पथकाच्या टिमने ही कारवाई केली.
Web Title: Raid on two lodge Prostitution, release of 6 women
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App