Home संगमनेर संगमनेर तालुक्यात घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रकमेसह पोबारा

संगमनेर तालुक्यात घराचा कडी कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रकमेसह पोबारा

Sangamner Taluka Sakur village theft 

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील साकुर येथे शनिवारी चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेने साकुर परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तरपणे माहिती अशी की, साकुर येथे वनवे नगर येथे किशोर बनसोडे हे राहत आहे. त्यांनी बनसोडे वस्ती येथे नवीन घर बांधले आहे. ते नवीन घराची वास्तू शांती करण्यासाठी घरातील सर्व वस्तू आटोपून सोन्याचे दागिने व रोख रक्कम कपाटात ठेऊन बनसोडे वस्ती येथे गेले होते. शनिवारी मध्यरात्री घरात कोणही नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत कपाटातील रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी करून पसार झाले. पहाटे दोन वाजेच्या सुमारास आजूबाजूंच्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने या घटनेची माहिती बनसोडे यांना देण्यात आली.दरम्यान या घटनेची माहिती घारगाव पोलिसांना समजताच पोलिसांनी घटना स्थळी भेट देत पंचनामा केला.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Sangamner Taluka Sakur village theft 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here