Home Ahmednagar Live News Crime: विवाहितेचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी

Crime: विवाहितेचा विनयभंग, जीवे मारण्याची धमकी

Shrirampur Crime Marriage molestation, death threats

Ahmednagar News Live | Shrirampur Crime: श्रीरामपूर: श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे एका विवाहितेला मारहाण व विनयभंग केला तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गावातील पोपट वाकडे व संतोष वाकडे यांच्यावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महिलेने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. या फिर्यादीनुसार विवाहित महिला घरासमोरील आंगण झाडत असताना पोपट व त्याचा मुलगा संतोष वाकडे हे दोघे जण तेथे आले, त्यांनी आंगण झाडू नको असे म्हणत विरोध केला. शिवीगाळ व लज्जास्पद वर्तन केले. तसेच आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Shrirampur Crime Marriage molestation, death threats

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here